आणखी ५४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:17 AM2021-03-22T04:17:13+5:302021-03-22T04:17:13+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५४१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये बार्शीटाकळी येथील ५३, तेल्हारा येथील ४६, हिवरखेड येथील १८, डाबकी रोड येथील १६, पातूर येथील १४, भंडारज बु. येथील १२, बोरगाव येथील ११, जीएमसी व पारस येथील प्रत्येकी नऊ, खडकी, अडगाव बु., बाळापूर येथील प्रत्येकी सात, बाळापूर नाका व कृषिनगर येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, खदान, सोनटक्के प्लॉट, अकोट फैल, चांडक प्लॉट, वाडेगाव, मोठी उमरी दोनवाडा, जवाहरनगर, खोलेश्वर, टिटवा व नागठाणा येथील प्रत्येकी तीन, हरिहर पेठ, जुने शहर, गजानननगर, रणपिसेनगर, बोरगाव वैराळ, मूर्तिजापूर, मलकापूर, झुरळ बु., उरळ बु., पिंपळखुटा, व्हीएचबी कॉलनी, पोळा चौक, कोळंबी, चांदुर व केळकर हॉस्पिटल येथील प्रत्येकी दोन, शास्त्रीनगर, कच्ची खोली, उगवा, जुने आरटीओ रोड, कौलखेड, विवरा, मालसूर, नेरधामणा, जाजूनगर, गीतानगर, इंद्रा कॉलनी, भीमनगर, अंबिकानगर, खरप, फडकेनगर, तिवसा, तारफैल, सालासार मंदिर, माधवनगर, आश्रयनगर, गुल्दवाला प्लॉट, हमजा प्लॉट, माळीपुरा, गुडधी, देगाव, मांडवा, तळेगाव बाजार, पाथर्डी, नयागाव, राधेनगर, गणेश सोसायटी, निमवाडी, सिंधी कॅम्प, वनी रंभापूर, लक्ष्मीनगर, हाता, नया अंदुरा, वाशिम बायपास, रिधोरा, राहुलनगर, लहान उमरी, कंवरनगर, तापडियानगर, अमाखाँ प्लॉट, महागाव, म्हैसपूर, रजपूतपुरा, गोरक्षण रोड, रामदासपेठ, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, साईनगर, अनिकट, लकडगंज, मोहता मिल, चिखलगाव, दाबकी, खेळ मुंगसांजी, तळेगाव पार्तुडा, बलवंत कॉलनी, सातव चौक, जठारपेठ, हिंगणा फाटा, सोमठाना व अमोना (ता. अकोट) येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी मूर्तिजापूर येथील १३, मोठी उमरी येथील ११, लहान उमरी येथील सहा, कौलखेड, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी पाच, गांधीग्राम, डाबकी रोड व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी व खदान येथील प्रत्येकी तीन, कमलानगर, कमल सोसायटी, न्यू खेताननगर, देशमुख फैल, लक्ष्मीनगर, शमशेरपूर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी दोन, न्यू तापडियानगर, आळशी प्लॉट, गंगानगर, खरप बु., भारती प्लॉट, चैतन्यवाडी, रवीनगर, दुर्गा चौक, बिर्ला कॉलनी, गड्डम प्लॉट, खेडकरनगर, दहिहांडा, कृषिनगर, अशोकनगर, कंचनपूर, कासनापूर, बाळापूर, अकोट फैल, दगडगाव, खडकी, शास्त्रीनगर, पिंपळनेर, दिग्रस खुर्द, नेरधामना, येवतखेड, गजानननगर, शिवनी, रामकृष्णनगर, कोठारीनगर, एमआयडीसी, पीकेव्ही, सांगवी खुर्द, हिंगणा, सहकारनगर, भंडारज (ता. पातूर), गीतानगर, कृषिनगर, खडकी, सांगळूद, गोकूल कॉलनी, तेल्हारा, रामनगर, रणपिसेनगर, घुसर, सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन, अडगाव (ता. पातूर), सावतवाडी, जवाहरनगर, व्हीएचबी कॉलनी, केशवनगर, गोरक्षण रोड, मोहिते प्लॉट, न्यू तार फैल, उमरी, नरहरीनगर व पळसो बढे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
९४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, बिहाडे हॉस्पिटल येथील तीन, सहारा हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन, युनिक हॉस्पिटल येथून एक, अवघाते हॉस्पिटल येथून एक, नवजीवन हॉस्पिटल येथून एक, उपजिल्हा आरोग्य मूर्तिजापूर येथून सात, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून सात, ओझोन हॉस्पिटल येथून तीन, बॉईज हॉस्टेल अकोला येथून १५, अकोला ॲक्सिडेंट येथून तीन, आधार हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून दोन, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथून दोन तर कोविड केअर सेंटर बाळापूर येथून दोन, अशा एकूण ९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,२२४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४,४०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,७६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,२२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.