अकोल्यात कोरोनाचे आणखी ६३ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या ४०१४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 12:38 PM2020-08-31T12:38:46+5:302020-08-31T12:40:20+5:30

सोमवार, ३१ आॅगस्ट रोजी आरटपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

Another 63 corona patients were found in Akola; Total number of patients at 4014 | अकोल्यात कोरोनाचे आणखी ६३ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या ४०१४ वर

अकोल्यात कोरोनाचे आणखी ६३ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या ४०१४ वर

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार, ३१ आॅगस्ट रोजी आरटपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४,०१४ वर पोहचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी ३१९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत २५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये २६ महिला व ३७ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये जसगाव येथील १३ जण, निंबा येथील नऊ जण, पिंपळखुटा येथील चार जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, सस्ती ता.पातूर, जीएमसी, मोठी उमरी, जूने शहर, डाबकी रोड, जठारपेठ व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित रुईखेड, चतारी ता.पातूर, उमरा ता. अकोट, सिरसो ता. मुर्तिजापूर, जय हिंद चौक, वरुर जऊळका ता. अकोट, मोºहळ ता. बार्शीटाकळी, रेणुका नगर, तारफैल, किर्ती नगर, सहकार नगर, खडकी, अमानखा प्लॉट, अकोट,मुरबा ता. मुर्तिजापूर, निमवाडी, सिंदखेड ता.बार्शीटाकळी, वाडेगाव,भिम नगर व शिवर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.


६९४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,०१४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,१६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६९४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Another 63 corona patients were found in Akola; Total number of patients at 4014

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.