अकोला जिल्ह्यात आणखी ७६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:16 PM2021-02-15T16:16:46+5:302021-02-15T16:16:53+5:30
CoronaVirus News आणखी ७६ पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,४८१ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ७६ पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,४८१ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड येथील पाच, चिंतामणी नगर, स्टेशन रोड, अकोट फैल व जीएससी येथील चार, डाबकी रोड, आळशी प्लॉट, जीएससी बॉय हॉस्टेल, मोठी उमरी, तापडीया नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, केशव नगर, गीता नगर, तापडीया नगर, रवी नगर, संतोष नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन, तर अकोट, पाटी, रवीनगर, कोठारी वाटीका, कपील नगर,खडकी, गायत्री नगर, राजपूत पुरा, रिध्दी सिध्दी, रणपिसे नगर, शंकर नगर, जीएससी, लहान उमरी, कौलखेड, हिंगज, जठारपेठ, निंबा ता.मुर्तिजापूर, डोंगरगाव, मुर्तिजापूर, तुकाराम चौक, तेलीपुरा, सिंधी कॅम्प, राधे नगर व जूने शहर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
९९८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,४८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,१४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.