डाळ चोरीप्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2016 03:07 AM2016-09-16T03:07:11+5:302016-09-16T03:07:11+5:30
उडीद मोगर डाळ लंपास केल्याप्रकरणी आणखी एका आरोपीस गुरुवारी दुपारी अटक
अकोला, दि. १५: एमआयडीसी क्रमांक तीनमधील गोदामामधून ८0 बॅग उडीद मोगर डाळ लंपास केल्याप्रकरणी आणखी एका आरोपीस सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. पोलिसांनी यापूर्वी दोन आरोपींना अटक केली होती. एमआयडीसी क्रमांक तीनमधील राधा एजन्सीच्या गोदामामधून वर्षभरापूर्वी सहा आरोपींनी सहा लाख ४0 हजार रुपये किमतीची ८0 बॅग उडीद मोगर डाळ लंपास केली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून डाळ जप्त करण्यात आली; परंतु प्रकरणातील तीन आरोपी वर्षभरापासून फरार होते. पोलिसांनी बडनेरा येथील म्हाडा कॉलनीत राहणारे आरोपी राजपाल लोणारे आणि धरमदास नंदागवळी यांना यापूर्वीच अटक केली आहे. गुरुवारी पोलिसांनी म्हाडा कॉलनी बडनेरा येथे राहणारा आरोपी सतीश विठोबा गोंडाणे (३५) याला अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.