महिलेच्या हत्याकांडातील दुसरा आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:21 AM2021-02-09T04:21:07+5:302021-02-09T04:21:07+5:30

अकाेला : माेठी उमरी परिसरातील रहिवासी प्रिया माेरे हिची तिचा प्रियकर व त्याचा मित्र या दाेघांनी २६ एप्रिल २०१८ ...

Another accused in woman's murder arrested | महिलेच्या हत्याकांडातील दुसरा आराेपी अटकेत

महिलेच्या हत्याकांडातील दुसरा आराेपी अटकेत

Next

अकाेला : माेठी उमरी परिसरातील रहिवासी प्रिया माेरे हिची तिचा प्रियकर व त्याचा मित्र या दाेघांनी २६ एप्रिल २०१८ राेजी वरुळ राेडवरील शिरखेड येथे गळा आवळून हत्या केली हाेती. या हत्याकांडातील फरार असलेल्या आराेपीस शिरखेड पाेलिसांनी तब्बल दाेन वर्षानंतर रायगड येथून अटक केली.

प्रिया गजानन माेरे या महिलेचे सागर ऊर्फ प्रेम दीपक बरगट याच्यासाेबत प्रेम हाेते. त्यामुळे दाेघेही मूर्तिजापूर येथे भाड्याने खाेली करून राहत हाेते. दरम्यान, प्रियाने सागरकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र सागर लग्न करण्याच्या मन:स्थितीत नसल्याने त्याने प्रियाची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर त्याचा साथीदार राजौरा सराेदे येथील रहिवासी अमरदीप राजेंद्र भगत याला साेबत घेतले. त्याला प्रियाची हत्या करण्याचा पैर्ण कट समजावून सांगितल्यानंतर प्रियाची अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी प्रियाच्या मृतदेहावर राॅकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी पाेलिसांना हा प्रकार माहिती झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला प्रियाची ओळख पटविली असता ती अकाेल्यातील माेठी उमरी येथील रहिवासी असल्याचे समाेर आले. त्यानंतर तपास करीत असतानाच तिची हत्या सागर बरगट याने केल्याची माहिती मिळाली. यावरून सागरला तातडीने अटक केली. मात्र हत्याकांडात साेबत असलेला सागरचा साथीदार अमरदीप भगत तेव्हापासून फरार हाेता. पाेलीसही त्याच्या मागावर असतानाच त्यांना दाेन वर्षांनंतर माहिती मिळाली की आराेपी रायगड जिल्ह्यातील औद्याेगिक वसाहतमध्ये आहे. यावरून पाेलिसांनी रायगड गाठून त्याला अटक केली. या हत्याकांड प्रकरणातील आता दाेन्ही आराेपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Another accused in woman's murder arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.