आणखी चाैघांचा मृत्यू, ६६१ पाॅझिटिव्ह; ४४५ रुग्णांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:48 AM2021-03-15T11:48:10+5:302021-03-15T11:48:16+5:30
Buldhana Corona Update चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ६६१ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून रविवारी आणखी चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ६६१ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. उपचारादरम्यान हिवराआश्रम (ता. मेहकर) येथील ८० वर्षीय पुरुष, विष्णुवडी, बुलडाणा येथील ७० वर्षीय महिला, संग्रामपूर येथील ८० वर्षीय पुरुष, मेहकर येथील ६२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच १२८२ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ आले असून ४४५ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
पॉझीटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०८ , बुलडाणा तालुका नांद्राकोळी १, सुंदरखेड ४, पांगरी १, भादोला १, खेर्डी १, येळगाव १, गिर्डा ४, डोंगर खंडाळा १, सिंदखेड मातला १, कोलवड १, डोंगर शेवली १, पाडळी २, खुपगाव १, बिरसिंगपूर १, अंबोडा १, शिरपूर १, देऊळघाट २, जामठी २, सागवान १, खामगांव शहर ३७, खामगांव तालुका पिंपरी गवळी १, लाखनवाडा १, लांजुड १, अंबेटाकळी १, चिंचपुर २, हिवरा खू १, घाटपूरी २, राहुड १, नांदुरा तालुका निमगाव २, कोळंबा ४, वाडी ५, विटाळी ५, शेंबा ४, कडेगाव १, शिरसोळी १, तांदूळवाडी २, जवळा बाजार १, खैरा १, मलकापूर शहर ३४, मलकापूर तालुका लोणवडी ३१, दाताळा ९, दुधलगाव २, वडजी २३, वरखेड २, वाडोदा १, देवधाबा १, चिखली शहर २१, चिखली तालुका सवणा १, दिवठणा १, भोकर २, कोलारा १, पळसखेड जयंती २, सातगाव भुसारी ३, अमोणा १, सोनेवाडी १, मंगरुळ नवघरे २, कोळेगाव १, पेठ १, शेलसूर १, पळसखेड दोलत १, दहिगाव १, सोमठना १, कोनड १, उंद्री ३, मुंगसारी १, करवंड १, सिं. राजा शहर १३, सि. राजा तालुका साखरखेर्डा १, दुसरबिड १, राहेरी खु २, हनवतखेड १, वरुडी १, वसंत नगर ४, सवखेड तेजन १, मोताळा तालुका कोथळी १, राजूर १, पि. गवळी १, किन्होळा २, गुगळी १, वारुडी २, शेलापुर १, काबरखेड २, मोताळा शहर : ३, शेगाव शहर २१, शेगाव तालुका नागझरी १०, भोणगाव १०, वरखेड ३, जवळा १, बाभूळगाव १, संग्रामपूर तालुका : सोनाळा ६, बावणबीर २, वानखेड १, बोडखा १, कवठळ १, जळगांव जामोद शहर ३०, जळगाव जामोद तालुका कुरणगड बु ३, सुपो पळशी १, आसलगाव ६, पिंपळगाव काळे १, काजेगाव ७, जामोद ४, सुलज १, दे. राजा शहर २४, दे. राजा तालुका अंढेरा १, चिंचोली बुरुकुल १८, गारखेड १, गोळेगाव १, दागडवाडी १, दे. माही १, वाकी १, लोणार शहर १३, लोणार तालुका हिरडव १, अंजनी खू १, बिबी २, मेहकर शहर २९, मेहकर तालुका हिवरा आश्रम २, कळमेश्वर १०, पेन टाकळी १, जनेफळ २, ब्रह्म पुरी १, सारंगपूर २, अकोला ठाकरे २, करंजी १, दे. माळी २, उकळी ३, बाभुळखेड ७, डोंणगाव २, शहापूर १, कणका १, नांदुरा शहर १५, मूळ पत्ता जालना १, पारस जि. अकोला १, वाशिम १, नागपूर १, कारंजा जि. वाशिम येथील एकाचा समावेश आहे. रविवारी पॉझिटिव्हीटी रेट ३४ टक्के होता.