आणखी एकाचा मृत्यू, १०० पॉझिटिव्ह, ५० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:20 AM2021-02-16T04:20:12+5:302021-02-16T04:20:12+5:30
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी हिवरखेड येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची ...
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी हिवरखेड येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३४४ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये २४ असे एकूण १०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १२,५०५वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड येथील पाच, चिंतामणी नगर, स्टेशन रोड, अकोट फैल व जीएससी येथील चार, डाबकी रोड, आळशी प्लॉट, जीएससी बॉय हॉस्टेल, मोठी उमरी, तापडीया नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, केशव नगर, गीता नगर, तापडीया नगर, रवी नगर, संतोष नगर व जठार पेठ येथील प्रत्येकी दोन, तर अकोट, पाटी, रवी नगर, कोठारी वाटिका, कपिल नगर, खडकी, गायत्री नगर, राजपूतपुरा, रिध्दी-सिध्दी, रणपिसे नगर, शंकर नगर, जीएससी, लहान उमरी, कौलखेड, हिंगज, जठारपेठ, निंबा (ता. मूर्तिजापूर), डोंगरगाव, मूर्तिजापूर, तुकाराम चौक, तेलीपुरा, सिंधी कॅम्प, राधे नगर व जुने शहर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
हिवरखेड येथील वृद्धाचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या हिवरखेड येथील ८१ वर्षीय पुरुष रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला. या रुग्णाला ८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
५० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, अवघाते हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले २३ अशा एकूण ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
९७१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,५०५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,१९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९७१ रुग्ण उपचार घेत आहेत.