अकोला जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, ७६ पॉझिटिव्ह, ५० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 06:48 PM2021-02-15T18:48:50+5:302021-02-15T18:49:04+5:30

CoronaVirus News हिवरखेड येथील वृद्ध व्यक्तिचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३४४ झाली आहे.

Another death in Akola district, 76 positive, 50 corona free | अकोला जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, ७६ पॉझिटिव्ह, ५० कोरोनामुक्त

अकोला जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, ७६ पॉझिटिव्ह, ५० कोरोनामुक्त

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी हिवरखेड येथील वृद्ध व्यक्तिचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३४४ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ७६ पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,४८१ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड येथील पाच, चिंतामणी नगर, स्टेशन रोड, अकोट फैल व जीएससी येथील चार, डाबकी रोड, आळशी प्लॉट, जीएससी बॉय हॉस्टेल, मोठी उमरी, तापडीया नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, केशव नगर, गीता नगर, तापडीया नगर, रवी नगर, संतोष नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन, तर अकोट, पाटी, रवीनगर, कोठारी वाटीका, कपील नगर,खडकी, गायत्री नगर, राजपूत पुरा, रिध्दी सिध्दी, रणपिसे नगर, शंकर नगर, जीएससी, लहान उमरी, कौलखेड, हिंगज, जठारपेठ, निंबा ता.मुर्तिजापूर, डोंगरगाव, मुर्तिजापूर, तुकाराम चौक, तेलीपुरा, सिंधी कॅम्प, राधे नगर व जूने शहर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

हिवरखेड येथील वृद्धाचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या हिवरखेड येथील ८१ वर्षीय पुरुष रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला. या रुग्णास ८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

५० जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले २३ अशा एकूण ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

९४७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,४८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,१९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another death in Akola district, 76 positive, 50 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.