अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, ३८ नवे पॉझिटिव्ह, ४५ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 06:00 PM2020-12-15T18:00:27+5:302020-12-15T18:01:52+5:30
Akola CoronaVirus News १५ डिसेंबर रोजी भौरद येथील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३०५ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग किंचित मंदावला असला तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. मंगळवार, १५ डिसेंबर रोजी भौरद येथील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३०५ वर गेला आहे. दिवसभरात ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १११४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०७६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तोष्णीवाल लेआऊट येथील दोन, तर गोरक्षण रोड, मेन सिटी, यमुना संकुल, बार्शीटाकली, बाळापूर, वाशिम बायपास, देशमुख फैल व उजवलेश्वर ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी गोरक्षण रोड येथील पाच, गणेश नगर छोटी उमरी येथील चार, संतोष नगर व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, पातूर, उरळ बु., अडोशी, बिर्ला राम मंदिर, जीतापूर खेडकर, रामटेक, जठारपेठ, आपातापा, बिर्ला कॉलनी, काळा मारोतीजवळ, न्यु राधाकिशन प्लॉट, आदर्श कॉलनी, मराठा नगर, गायत्री नगर व मलकापूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
मंगळवारी भौरद येथील ७५ वर्षीय पुरुषाचा खाजगी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ११ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
४५ जणांची कोरोनावर मात
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, युनिक हॉस्पीटल येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ३१ अशा एकूण ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६४६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९२८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.