आणखी एकाचा मृत्यू, ५२ पॉझिटिव्ह, १९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:45 AM2021-01-13T04:45:58+5:302021-01-13T04:45:58+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ५२१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ५२१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सिंधी कॅम्प येथील तीन, डाबकी रोड, मलकापूर, जठारपेठ व रणपिसेनगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जांभा, ता. मूर्तिजापूर, रचना कॉलनी, मरोडा ता. अकोट, पीकेव्ही, राधेनगर, न्यू तापडियानगर, कृषिनगर, भीमनगर, जुने शहर, अकोट, छोटी उमरी, खडकी, आर. के. प्लॉट, गीतानगर, गोरक्षणरोड, तांदळी बु., ता. पातूर, सहारानगर, कैलासनगर, बिर्ला गेट, गौतमनगर, अशोकनगर, आदर्श कॉलनी, व्हीएचबी कॉलनी, दक्षतानगर, कौलखेड, पातूर, दीपक चौक, सिलोडा व रामदासपेठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी लाडेगाव, ता. अकोट, देवरी, ता. अकोट व जलतारे प्लॉट येथील प्रत्येकी एक असा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
४७ वर्षीय महिला दगावली
रविवारी चक्रधर कॉलनी, गुडधीरोड येथील ४७ वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यांना दि. ६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
१९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, अकोला ॲक्सिडेंट क्लिनिक येथून दोन अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६२६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,९२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,९७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.