आणखी एकाचा मृत्यू, ६८ पॉझिटिव्ह, १०८ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:18 AM2021-02-12T04:18:10+5:302021-02-12T04:18:10+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Another died, 68 positive, 108 corona free | आणखी एकाचा मृत्यू, ६८ पॉझिटिव्ह, १०८ कोरोनामुक्त

आणखी एकाचा मृत्यू, ६८ पॉझिटिव्ह, १०८ कोरोनामुक्त

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड येथील आठ, मूर्तिजापूर येथील सहा, अकोट येथील पाच, मोठी उमरी, न्यू तापडीया नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, बार्शी टाकळी, कौलखेड, बाळापूर, पातूर, सिंधी कॅम्प, आयडीबीआय बँकसमोर, गड्डम प्लॉट व बाळापूर नाका येथील प्रत्येकी दोन, तर मांजरी, आदर्श कॉलनी, गोकुलनगर, जीएमसी हॉस्टेल, जीएमसी कर्मचारी, डाबकी रोड, जठारपेठ, कुंभारी, म्हातोडी, गुरुदेवनगर, अंबिका नगर, हिवरखेड, मलकापूर, गीता नगर, माना, कुरुम ता.मूर्तिजापूर, कंझरा ता.मूर्तिजापूर, परिवार कॉलनी, रणपिसे नगर, जीएमसी व अडगाव खुर्द ता. अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

अडगाव येथील पुरुष दगावला

कोरोनावर उपचार घेत असलेल्या अडगाव बु. ता. तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना ७ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

१०८ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३, ओझोन हॉस्पिटल येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले ८३ असे एकूण १०८ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

६८३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,०६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,०३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another died, 68 positive, 108 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.