आणखी तिघांचा मृत्यू,३९१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 07:07 PM2021-03-16T19:07:46+5:302021-03-16T19:43:45+5:30
CoronaVirus in Akola १६ मार्च रोजी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४०७ झाला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, १६ मार्च रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४०७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३२२ तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९अशा एकूण ३९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २२,२३८ वर पोहोचली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कारला येथील १८, मोठी उमरी येथील १२, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी ११, खदान व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, गोपालखेड येथील सहा, नकाक्षी, मलकापूर, सिंधी कॅम्प, खडकी व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, शिवणी, आदर्श कॉलनी व बापूनगर येथील प्रत्येकी चार, दधम, देशमुख फैल, रजपूतपुरा, आळशी प्लॉट, जठारपेठ, रामनगर व पंचशील नगर येथील प्रत्येकी तीन, जीपी क्वॉटर, शास्त्री नगर, तेल्हारा, जुने शहर, अकोट, बजरंग चौक, केशव नगर, वाशिम बायपास, हरिहर पेठ, तारफैल व संतोष नगर येथील प्रत्येकी दोन, म्हैसांग, आखतवाडा, बोरगाव वऱ्हाडे, सोनाळा, हसणापूर, डोंगरगाव, व्हीएचबी कॉलनी, हाता, मोऱ्हळ, एमआयडीसी, कान्हेरी, रणपिसे नगर, पातूर, खिश्चन कॉलनी, पारस, व्याळा, अंबाशी, राहुल नगर, न्यू भीम नगर, गौतम नगर, आनंद नगर, कीर्ती नगर, विद्युत कॉलनी, निमवाडी, हिंगणा रोड, रामदासपेठ, राधेनगर, श्रीराम टॉवर रोड, गंगाधर प्लॉट, खगारपुरा, माळीपुरा, तोष्णीवाल लेआऊट, पोळा चौक, दुबेवाडी, खेतान नगर, टॉवर चौक, शिवाजी नगर, जीडी ऑफीस, धामणी, वाडी अदमपूर, न्यू तापडिया नगर, सादिक नगर, रेपाडखेड, पंचगव्हाण, केळीवेळी, पिंपळखुटा, तामसी, अनिकट, काटीपाटी, माधव नगर, पीकेव्ही, बार्शीटाकळी, अशोक नगर, बाबुळगाव, राऊतवाडी, व महाजन प्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी मुर्तिजापूर येथील नऊ, मलकापूर व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, पातूर येथील सहा, लहान उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, शास्त्री नगर व कौलखेड येथील प्रत्येकी चार, हरिहरपेठ, कवठा शेलू व महाशब्दे हॉस्पिटल येथील प्रत्येकी तीन, राम नगर, मोठी उमरी, कोठारी वाटिकेच्या मागे, कोठारी वाटिका नं.२, जठारपेठ, गाडगे नगर, साई नगर, गीता नगर, महाकाली नगर येथील प्रत्येकी दोन, महान, राजुरा सरोदे ता. मुर्तिजापूर, रणपिसे नगर, गोरक्षण रोड, न्यू तापडिया नगर, कंवर नगर, शरद नगर, रामदासपेठ, अकोट, राजंदा ता. बार्शिटाकळी, तोष्णीवाल ले-आऊट, विद्युत कॉलनी, गायगाव, जुने शहर, कानशिवणी, सिव्हील लाईन, जवाहर नगर, जोगळेकर प्लॉट, सुधीर कॉलनी, भारती प्लॉट, पंचशील नगर, गुरुदेव नगर, रेल्वे गेट, जयरामसिंग प्लॉट, पंचवटी चौक, गणेश नगर, शिवसेना वसाहत, गायत्री नगर, अनंत नगर व भाग्योदय नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोन महिला, एका पुरुषाचा मृत्यू
मुर्तिजापूर ६० वर्षीय महिला, खदान, अकोला येथील ४६ वर्षीय महिला व आदर्श कॉलनी, अकोला येथील ५५ वर्षीय पुरुष अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. या तीघांनाही अनुक्रमे १० मार्च , २ मार्च व ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
४२३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पिटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील पाच, कोविड केअर सेटर पास्टूल अकोट येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा, बाॅईज हास्टेल, अकोला येथून १०, बिहाडे हॉस्पिटल येथून सहा, अवघाते हॉस्पिटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील ३३२ अशा एकूण ४२३ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५,०६१ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,२३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,७७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,०६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.