कोरोनाचा आणखी एक बळी; १६ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:27 PM2020-08-18T12:27:08+5:302020-08-18T12:27:19+5:30

अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या आजाराच्या बळींची एकूण संख्या १३७ वर गेली आहे.

Another victim of Corona; 16 new positives | कोरोनाचा आणखी एक बळी; १६ नवे पॉझिटिव्ह

कोरोनाचा आणखी एक बळी; १६ नवे पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १८ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या आजाराच्या बळींची एकूण संख्या १३७ वर गेली आहे. तर आणखी १६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३२७५ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १९६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील सहा जणांसह, दहिगाव गावंडे येथील चार, अकोला शहरातील गड्डम प्लॉट येथील दोन, सिद्धार्थ नगर जूने शहर, कृषी नगर, अष्टविनायक नगर व तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

७४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
जुने शहरातील सिद्धार्थनगर भागातील ७४ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १३ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.

४४३ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २६९५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४४३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Another victim of Corona; 16 new positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.