कोरोनाचा आणखी एक बळी; २७ नवे पॉझिटिव्ह, १५ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 06:07 PM2020-11-21T18:07:03+5:302020-11-21T18:07:13+5:30
Akola CoronaVirus News आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २८८ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २८८ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,९५६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६४५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये गोकुळ कॉलनी व डाबकी रोड येथील प्रत्येकी तीन, जीएमसी व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन, तर तांदळी ता. पातूर, आस्टूल ता. पातूर, जनूना ता. पातूर, जूना तारफैल, सिरसो ता. मुर्तिजापूर, मुर्तिजापूर, दहातोंडा, कोणवाडी, निंबा ता. मुर्तिजापूर, केळकर हॉस्पीटल, गोरे अपार्टमेंट आकाशवाणी मागे, रेणूका नगर, उमरी नाका, न्यू तापडीया नगर, अकोट, शिवणी व अकोट फैल येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू
शनिवारी एका ७० वर्षीय अनोळखी रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास १९ नोव्हेंबर रोजी दाखल झाला करण्यात आले होते.
१५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिºहाडे हॉस्पीटल येथून एक, तर हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४५१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,९५६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८२१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४५१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.