कोरोनाचा आणखी एक बळी; ३४ पॉझिटिव्ह, ६३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 06:00 PM2020-08-23T18:00:52+5:302020-08-23T18:36:28+5:30
मुर्तीजापूर शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४४ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. रविवार, २३ आॅगस्ट रोजी मुर्तीजापूर शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४४ झाली आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २७, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये ७ असे एकूण ३४ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४७५ झाली असून, ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३९७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७ जण पॉझिटिव्ह असून, तब्बल ३७० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये १२ महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मूर्तिजापूर येथील नऊ जण, तेल्हारा तालुक्यातील चांगेफळ व पाथर्डी येथील प्रत्येकी तीन जण, बेलखेड व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, नायगाव, जय हिंद चौक, खदान, म्हैसपुर, राजराजेश्वर नगर, शिवसेना वसाहत, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव व तेल्हारा येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुर्तीजापूर येथील वृद्ध दगावला
रविवारी मुर्तीजापूर शहरातील कोकणवाडी भागातील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णास १८ आॅगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
रॅपिड चाचण्यांमध्ये सात पॉझिटिव्ह
रविवारी दिवसभरात झालेल्या १४१ रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यामध्ये सात जण पॉझिटिव्ह आढळून आले. अकोला मनपा क्षेत्रात सहा, तर आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी एकअसे एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ११४०२ चाचण्यांमध्ये ५९० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
६३ जणांना डिस्चार्ज
रविारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून पाच, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून सहा अशा एकूण ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३२७ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३००४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३२७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.