कोरोनाचा आणखी एक बळी, ४२ नवे पॉझिटिव्ह, ४५ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:25+5:302020-12-16T04:34:25+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १११४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, ...

Another victim of corona, 42 new positive, 45 corona free | कोरोनाचा आणखी एक बळी, ४२ नवे पॉझिटिव्ह, ४५ जण कोरोनामुक्त

कोरोनाचा आणखी एक बळी, ४२ नवे पॉझिटिव्ह, ४५ जण कोरोनामुक्त

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १११४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०७६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तोष्णीवाल लेआऊट येथील दोन, तर गोरक्षण रोड, मेन सिटी, यमुना संकुल, बार्शीटाकळी, बाळापूर, वाशिम बायपास, देशमुख फैल व उजवलेश्वर ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी गोरक्षण रोड येथील पाच, गणेशनगर छोटी उमरी येथील चार, संतोषनगर व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, पातूर, उरळ बु., अडोशी, बिर्ला राममंदिर, जीतापूर खेडकर, रामटेक, जठारपेठ, आपातापा, बिर्ला कॉलनी, काळा मारोतीजवळ, न्यू राधाकिशन प्लॉट, आदर्श कॉलनी, मराठानगर, गायत्रीनगर व मलकापूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

मंगळवारी भौरद येथील ७५ वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ११ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये चार पॉझिटिव्ह

मंगळवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ११६ रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये केवळ चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत झालेल्या २७,१५७ चाचण्यांमध्ये १८६५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

४५ जणांची कोरोनावर मात

मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जण, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, युनिक हॉस्पिटल येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पिटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ३१ अशा एकूण ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६५० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९३२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another victim of corona, 42 new positive, 45 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.