कोरोनाचा आणखी एक बळी, ५० नवे पॉझिटिव्ह, १८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 06:25 PM2021-01-24T18:25:04+5:302021-01-24T18:26:03+5:30
CoronaVirus News मुर्तीजापूर तालु्क्यातील आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३३२ वर पोहोचली आहे.
अकोला : कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, २४ जानेवारी रोजी मुर्तीजापूर तालु्क्यातील आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३३२ वर पोहोचली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५० रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,३९१ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १२३० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११८० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील पाच, गोरक्षण रोड येथील तीन, जि.प. शाळा उमरी, कालवडी ता. अकोट, खदान, दहिगाव ता. तेल्हारा, बोरगाव मंजू, परिवार कॉलनी, अकोट, बोरमळी, जि.प. शाळा कौलखेड, जि.प. शाळा कासली बु. व बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालानुसार स्वावलंबी नगर, मलकापूर व खडकी येथील प्रत्येकी तीन, अकोट, कौलखेड व गीता नगर येथील प्रत्येकी दोन, कवठा, घोडेगाव ता. तेल्हारा, मालेगाव ता. तेल्हारा, अकोला जहागीर, गोकुळ कॉलनी, शास्त्री नगर, अनंत नगर, तोष्णीवाल लेआऊट, बालाजी नगर, अप्पा मंगल कार्यालय जवळ, सिंधी कॅम्प, बोरगाव खुर्द, राजनखेड ता. बार्शीटाकळी, गजानन नगर, गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे.
६५ वर्षीय पुरुष दगावला
शनिवारी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लाडपूर कंझरा ता.मूर्तिजापूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना १८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
१८ जण कोरोनामुक्त
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून नऊ, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सहा अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६५७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,३९१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,४०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.