कोरोनाचा आणखी एक बळी, ५६ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:49+5:302021-01-25T04:19:49+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १२३० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १२३० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११८० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील पाच, गोरक्षण रोड येथील तीन, जि.प. शाळा उमरी, कालवडी ता. अकोट, खदान, दहिगाव, ता. तेल्हारा, बोरगाव मंजू, परिवार कॉलनी, अकोट, बोरमळी, जि.प. शाळा कौलखेड, जि.प. शाळा कासली बु. व बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालानुसार स्वावलंबीनगर, मलकापूर व खडकी येथील प्रत्येकी तीन, अकोट, कौलखेड व गीता नगर येथील प्रत्येकी दोन, कवठा, घोडेगाव, ता. तेल्हारा, मालेगाव, ता. तेल्हारा, अकोला जहागीर, गोकुळ कॉलनी, शास्त्रीनगर, अनंतनगर, तोष्णीवाल लेआऊट, बालाजीनगर, अप्पा मंगल कार्यालय जवळ, सिंधी कॅम्प, बोरगाव खुर्द, राजनखेड ता. बार्शीटाकळी, गजानन नगर, गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे.
६५ वर्षीय पुरुष दगावला
शनिवारी खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लाडपूर कंझरा ता.मूर्तिजापूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना १८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
६६३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,३९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,४०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
१८ जण कोरोनामुक्त
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून नऊ, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सहा अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.