कोरोनाचा आणखी एक बळी; ७३ नवे पॉझिटिव्ह, ६१ जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 07:14 PM2020-08-31T19:14:09+5:302020-08-31T19:14:22+5:30
जीएमसीच्या आरटपीसीआर चाचण्यांमध्ये ६५, तर नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेचे आठ, असे एकूण ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार, ३१ आॅगस्ट रोजी आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १५२ झाला आहे. अकोला जीएमसीच्या आरटपीसीआर चाचण्यांमध्ये ६५, तर नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेचे आठ, असे एकूण ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४,०२४ वर पोहचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी ३२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत २६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये जसगाव येथील १३ जण, निंबा येथील नऊ जण, पिंपळखुटा येथील चार जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, सस्ती ता.पातूर, जीएमसी, मोठी उमरी, जूने शहर, डाबकी रोड, जठारपेठ, सिरसोली ता. तेल्हारा व पिंपळखूटा ता. तेल्हारा येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित रुईखेड, चतारी ता.पातूर, उमरा ता. अकोट, सिरसो ता. मुर्तिजापूर, जय हिंद चौक, वरुर जऊळका ता. अकोट, मोºहळ ता. बार्शीटाकळी, रेणुका नगर, तारफैल, किर्ती नगर, सहकार नगर, खडकी, अमानखा प्लॉट, अकोट,मुरबा ता. मुर्तिजापूर, निमवाडी, सिंदखेड ता.बार्शीटाकळी, वाडेगाव,भिम नगर व शिवर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सस्ती येथील एकाचा मृत्यू
पातूर तालुक्यातील सस्ती येथील ५७ वर्षीय पुरुषाचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांना १९ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.
६१ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४७, कोविड केअर सेंटर येथून १०, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रेजेन्सी येथून एक अशा एकूण ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६४२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,०२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,२३० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.