कोरोनाचा आणखी एक बळी; ७७ नवे पॉझिटिव्ह; अॅक्टिव्ह रुग्ण १०६८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:38 PM2020-09-08T12:38:40+5:302020-09-08T12:39:02+5:30
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४७९३ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १६७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ७७ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४७९३ वर गेला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३२० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७७ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये २२ महिला व ५५ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये १५ मुर्तिजापूर येथील, गौरक्षण रोड येथील सात, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी पाच, महान व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन, तोष्णीवाल लेआऊट, जीएमसी क्वॉटर, कौलखेड, पळसो बढे, जवाहर नगर, शेकापूर ता. पातूर, केशव नगर, रणपिसे नगर व पार्वती नगर येथील प्रत्येकी दोन, वासूदेव नगर, बार्शीटाकळी, साखरविरा, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, आलेगाव, नागे लेआऊट, व्हिएचबी कॉलनी, गोयका नगर, भंडारज ता. पातूर, आरपीटीएस, गजानन पेठ, स्टेशन रोड, राजूरा प्लॉट, रेडवा ता. बार्शिटाकळी, सोपिनाथ नगर, खडकी, कृषी नगर, वाशिम बायपास, न्य तारफैल व खेतान नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
लहान उमरी येथील वृद्धचा मृत्यू
मंगळवारी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल. हा रुग्ण लहान उमरी, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष असून, त्यांना ६ सप्टेंबर रोजी दाखल झाला करण्यात आले होते. उपचारास दाद न दिल्याने त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.
१०६८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३५५८जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १०६८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.