अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; १८ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:44 PM2020-08-01T12:44:19+5:302020-08-01T12:44:29+5:30
शनिवार, १ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
अकोला : गत चार महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाचा कोरानाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शनिवार, १ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ’आरटीपीसीआर’ चाचण्यांमध्ये १८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १०६ झाली असून, एकूण रुग्णसंख्या २६५५ वर गेली आहे. सद्यस्थितीत ४५३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी ओळख झालेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे २५५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३७ निगेटिव्ह आहेत. यामध्ये आठ महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. यामध्यसे हिवरखेड तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील आठ जण, अकोट, खांबोरा बार्शिटाकली व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बाभूळगाव जहांगीर, बाळापूर, दहीहंडा, शिवाजी नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
जेतवन नगरातील एकाचा मृत्यू
शनिवारी अकोला शहरातील जेतवन नगर भागातील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना २६ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.
४५३ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६५५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०९६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४५३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.