अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, २६५ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 PM2021-03-07T16:16:10+5:302021-03-07T16:16:18+5:30

Akola CoronaVirus Update आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १९६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण ३९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

Another victim of corona in Akola district, 265 new positive | अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, २६५ नवे पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, २६५ नवे पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवार, ७ मार्च रोजी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३८४ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १९६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण ३९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९,०४५ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४७२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२७६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील ४२, अकोट येथील २८, तेल्हारा येथील १३, कौलखेड येथील ११, मोठी उमरी येथील सहा, डाबकी रोड, खडकी, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ येथील चार, रनणपिसे नगर, रजपूतपुरा, सिंधी कॅम्प, जीएमसी, केशव नगर व कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन, रतनलाल प्लॉट, शिवसेना वसाहत, लहान उमरी, खदान, रामदास पेठ, सेलार फैल, टेलीकॉम नगर, तुकाराम हॉस्पीटल जवळ, जवाहर नगर, हरीहर पेठ व विद्यानगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित निंभोरा, मित्रा नगर, शिवनी, पोळा चौक, हिमायु रोड, सुधीर कॉलनी, सहकार नगर, किर्ती नगर, न्यु तापडीया नगर, कलेक्टर ऑफिस, अनिकेत, हिंगणारोड, तोष्णीवाल लेआऊट, खोलेश्वर, अंबीका नगर, प्रबोधन नगर, सूर्या गार्डन, वर्धमान नगर, विठ्ठल नगर, सिव्हील लाईन, मुझफर नगर, चौरे प्लॉट, खिरपुरी, भारती प्लॉट, निमकर्दा, उमरी, तारफैल, केळकर हॉस्पीटल, सिटी कोतवाली, श्रध्दा कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, दोनद खु., कोठीर वाटीका, जीएमसी हॉस्टेल, बाळापूर, सांगवी बाजार व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

 

६१ वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोनवर उपचार सुरु असलेल्या वानखडे नगर, अकोला येथील ६१ वर्षीय महिला रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. त्यांना ४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

४,७९७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,०४५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,७९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another victim of corona in Akola district, 265 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.