अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, २७७ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 PM2021-03-01T16:34:44+5:302021-03-01T16:34:55+5:30
Akola CoronaVirus News आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१२ , रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ६५ अशा एकूण २७७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून सोमवार, १ मार्च रोजी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६८ एवढी झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१२ , तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ६५ अशा एकूण २७७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १६,४२२ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०४८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील २४, मुर्तिजापूर येथील २३, एमआयडीसी येथील १८, अकोट येथील १०, खडकी येथील नऊ, बाळापूर येथील आठ, शेलू बोंडे येथील सात, सुकळी, देवळी व राम नगर येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ, जीएमसी, रामदासपेठ व तुरखेड येथील प्रत्येकी चार, अडगाव, गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी व नया अंदुरा येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, रणपिसे नगर, खदान, कौलखेड, आकाशवाणी, मलकापूर, मोठी उमरी,वरुर, वाशिंबा, जीएमसी हॉस्टेल, हरिहर पेठ, संत नगर, दत्त कॉलनी, अंभोरा येथील प्रत्येकी दोन, रोहणखेड ता.अकोट, चितलवाडी, हिंगणा रोड, उमरी, किर्ती नगर, पीकेव्ही कॉलनी, गोरेगाव, रजपुतपूरा, वडद बु., एकलरा, लोहारा, देवगाव, विताली, कापरवाडी बु., अन्वी, वनीरंभापूर, मनारखेड, हिवरखेड, तेल्हारा, अकोट फैल, राऊतवाडी, शिव नगर, गड्डम प्लॉट, संतोषी माता मंदिर, अकोलखेड, तापडीया नगर, वृदावन नगर, मांजरी ता.बाळापूर, परदा ता.अकोट, न्यु तापडीया नगर, रतनलाल प्लॉट, बार्शिटाकळी, खोलेश्वर, हिंगणा फाटा, न्यु राधाकिसन प्लॉट, घोटा ता.बार्शिटाकळी, पुनोती ता.बार्शिटाकळी, राहित ता.बार्शिटाकळी, जामठी खु. व दहातोंडा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
४० वर्षीय महिलेचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या शिलोडा येथील ४० वर्षीय महिला रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांना २८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
३,७५२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६,४२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल १२,३०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३६८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,७५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.