अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३१ नवे रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:33 PM2020-12-16T12:33:12+5:302020-12-16T12:33:17+5:30
CoronaVirus News जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३०६ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, १६ डिसेंबर रोजी जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३०६ वर गेला आहे. तर आणखी ३१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण संख्या ९९६३ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५४६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये मोठी उमरी, चोहट्टा बाजार व न्यु आळशी प्लॉट येथील प्रत्येकी तीन, राम नगर, दुर्गा चौक, गीता नगर, वर्धमान नगर व उरळ ता. बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर पिकेव्ही, दिनोडा, मुर्तिजापूर, कृषि नगर, अकोट, मलकापूर, न्यू तापडीया नगर, आरोग्य नगर, जठारपेठ, कौलखेड, लहान उमरी व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
उरळ येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू
बुधवारी बाळापूर तालुक्यातील उरळ येथील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १४ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
६८० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६८०अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.