अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३१ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:57 PM2020-12-22T12:57:31+5:302020-12-22T12:58:22+5:30
CoronaVirus News तेल्हारा येथील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३१२ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, २१ डिसेंबर रोजी तेल्हारा येथील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३१२ झाली आहे. तर आणखी ३१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १०२१६ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी एकूण ३९२ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील चार, अमानखा प्लॉट, जठारपेठ, जवाहर नगर, मोठी उमरी व जुने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रिजेन्सी अपार्टमेंट, जगजीवन रामनगर, तेल्हारा, श्रद्धा रेसिडेन्सी, सहकार नगर, मलकापूर, बालाजी नगर, सिंधी कॉलनी, रतनलाल प्लॉट, बेलखेड, नुर नगर, रणपिसे नगर, बिर्ला रोड, रघुनंदन सोसायटी, शिवर, निमकर्दा व गायगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
तेल्हारा येथील वृद्धाचा मृत्यू
संभाजी चौक, तेल्हारा येथील ७१ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांना १५ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
८१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,२१६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,०८७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ८१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.