अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:16 PM2020-11-25T12:16:48+5:302020-11-25T12:17:06+5:30
CoronaVirus News बुधवारी पंचशील नगर, सिव्हील लाईन येथील ७० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार २५ नोव्हेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एका कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या २८९ झाली आहे. दरम्यान, आणखी ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९१७२ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ येथील पाच जण, प्रभात किड्स येथील तीन जण, कौलखेड, कुंभारी, अमाख्या प्लॉट व अकोट येथील प्रत्येकी दोन, लोहगड ता. बार्शिटाकळी, धाबा ता. बार्शिटाकळी, तेल्हारा, पातूर, अकोट रोड, हिंगणा रोड, विद्युत नगर, रिधोरा ता.बाळापूर, पत्रकार कॉलनी, खिरपूरी, लोहारा ता. बाळापूर, बंबर्डा ता. अकोट, मलकापूर रोड, दुर्गा चौक, बाळापूर, गोरक्षण रोड, किनखेडपुर्णा ता. अकोट व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू
बुधवारी पंचशील नगर, सिव्हील लाईन येथील ७० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना १८ नोव्हेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
५५४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,१७२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८३२९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५५४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.