अकोल्यात लुटमार टॅक्स विरोधी आंदोलन: अकोलेकरांनी स्वाक्षरी नोंदवून केला करवाढीचा विरोध

By atul.jaiswal | Published: February 8, 2018 05:05 PM2018-02-08T17:05:38+5:302018-02-08T19:33:16+5:30

अकोला :लुटमार टॅक्सविरोधी संघर्ष समितीने अकोल्याचे माजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन केले.

Anti-tax protest agitation in Akola: 50 thousand people signature | अकोल्यात लुटमार टॅक्स विरोधी आंदोलन: अकोलेकरांनी स्वाक्षरी नोंदवून केला करवाढीचा विरोध

अकोल्यात लुटमार टॅक्स विरोधी आंदोलन: अकोलेकरांनी स्वाक्षरी नोंदवून केला करवाढीचा विरोध

Next
ठळक मुद्देमाजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन.नागरीकांनी स्वाक्षरी आंदोलनात सहभागी होताना लूटमार टॅक्स हा अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली.वकील, डॉक्टर, व्यापारी, विविध समाजाच्या संघटना, मंडळे, शैक्षणिक संस्था व सर्व क्षेत्रातील नागरीकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.

अकोला : महानगरपालिकेने शहरातील नागरीकांच्या मालमत्तावर लावलेला नवीन कर रद्द करावा या मागणीसाठी लुटमार टॅक्सविरोधी संघर्ष समितीने अकोल्याचे माजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन केले. या आंदोलनात अकोलेकरांनी आपली स्वाक्षरी करुन लूटमार टॅक्सचा विरोध दर्शविला. गरीब व मध्यमवर्गीय नागरीकांनी स्वाक्षरी आंदोलनात सहभागी होताना लूटमार टॅक्स हा अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली. वयोवृद्ध स्त्री-पुरुष, विद्यार्थी-विद्यार्थिनी, वकील, डॉक्टर, व्यापारी, विविध समाजाच्या संघटना, मंडळे, शैक्षणिक संस्था व सर्व क्षेत्रातील नागरीकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी राज्यमंत्री अजहर हुसैन, प्रदेश प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे, रमाकांत खेतान, युसुफ अली, रफीक सिध्दीकी, निखीलेश दिवेकर, जावेद जकरीया, रमेश बजाज आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शविली.


विरोधी पक्षनेता साजीद पठाण, लुटमार टॅक्स विरोधी संघर्ष समितीचे अकोला मध्य झोन प्रमुख निकेश गुप्ता, अकोला पश्चीम झोन प्रमुख अ‍ॅड.पप्पु मोरवाल, अकोला उत्तर झोन प्रमुख नगरसेवक नौशाद, अकोला दक्षिण झोन प्रमुख हरिष कटारिया नगरसेवक सर्वश्री मो.इकबाल सिध्दीकी, फिरोज खान, जिशान हुसैन, मब्बा पहेलवान, मो.जमीर बरतनवाले, पराग कांबळे, मोंटू भाई, इरफान अ.रहेमान, मो.अवशाद, चांदणी रवी शिंदे, अजरा नसरीन मकसुद खान जैनब बी शेख ईब्राहीम, विभा राऊत, भास्करराव पारसकर, सुषमा निचळ, राजेंद्र चितलांगे, गणेश कटारे, अभिषेक भरगड, अनुप खरारे, सुरेश ढाकोळकर, राजेश भंसाली, राजू बगधरीया, कैलास देशमुख, मनीष नारायणे, जाबीर खान, पप्पु खान, अफरोज लोधी, लक्ष्मण भिमकर, रमेश समुद्रे, कपील रावदेव, अनंत बगाडे, उमेश इंगळे, रफीउल्ला खान, मनीष हिवराळे, सुरेश मामा शर्मा, जयंत चंगारे, शेख जावेद, शेख गनी दुगार्वाले कु.सिमा ठाकरे, सौ.सुषमा निचळ, मोहनी मांडलेकर, सौ.पुष्पा गुलवाडे, गणेश कळसकर, अशोक अस्वारे, सौ.विनया राजपूत, सौ.आशा कोपेकर, सौ.पुष्पा देशमुख, शारीक खान, देविदास सोनोने, प्रदिप खंडेलवाल, हाजी तौफीक अली,महादेव सिरसाट, करिम खॉ. बिसमिल्ला खॉ, ईस्माईल टिव्हीवाले, आकोश सायखेडे, हाजी अनिक अहमद खान, महादेवराव हुरपडे, सै.उमर सै.बाला, नंदा मिश्रा, राजेश सारवान, विकास खोसे, शे.हमीद शे.महेमुद, विलास गोतमारे, रमेश मोहोकार, महंमद युसुफ, गोपाल शर्मा, शरद गंगासागर आदींनी सहकार्य केले.

 

Web Title: Anti-tax protest agitation in Akola: 50 thousand people signature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.