अंत्योदय,प्राधान्य कुटुंब योजना; ऑक्टोबरचे नियतन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:29+5:302021-09-16T04:24:29+5:30
प्राधान्य गटाकरिता अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ९६ हजार ४३९ लाभार्थ्यांना गहू ५८९३ क्विं. तर तांदूळ ...
प्राधान्य गटाकरिता अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ९६ हजार ४३९ लाभार्थ्यांना गहू ५८९३ क्विं. तर तांदूळ ३९२९ क्विं., अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे २ लक्ष ७ हजार ३२१ लाभार्थ्यांना गहू ६२२० क्विं. तर तांदूळ ४१४६ क्विं., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ७ हजार ७५१ लाभार्थ्यांना गहू ३२३३ क्विं. तांदूळ २१५५ क्विं., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ३४ हजार ३४२ लाभार्थ्यांना गहू ४०३० क्विं. तर तांदूळ २६८७ क्विं., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष १० हजार ५१० लाभार्थ्यांना गहू ३३१६ क्विं.,तांदूळ २२१० क्विं., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ३५ हजार ४३४ लाभार्थ्यांना गहू ४०६३ क्विं. तर तांदूळ २७०८ क्विं., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ९२ हजार २२० लाभार्थ्यांना गहू २७६७ क्विं. तर तांदळाचा १८४४ क्विं. व मूर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष १५ हजार ५८५ लाभार्थ्यांना गहू ३४६८ क्विं. तर तांदूळ २३११ क्विं., असे एकूण १० लक्ष ९९ हजार ६०२ लाभार्थ्यांना ३२९९० क्विंटल गहू तर २१९९० क्विंटल तांदूळ असे नियतन मंजूर झाले आहे.
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे १३२० शिधापत्रिकांना १९८ क्विं. गहू, २६४ क्विं. तांदूळ, अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे ७११४ शिधापत्रिकांना १०६७ क्विं. गहू, १४२४ क्विं. तांदूळ, बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम ६९६४ शिधापत्रिकांना १०४५क्विं. गहू, १३९४ क्विं. तांदूळ, अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे ६९४७ शिधापत्रिकांना १०४२ क्विं. गहू, १३९० क्विं. तांदूळ, तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे ६४१९ शिधापत्रिकांना ९६२ क्विं. गहू, १२८४ क्विं. तांदूळ,बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ५४५० शिधापत्रिकांना ८१७ क्विं. गहू, १०९० क्विं. तांदूळ, पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ४७५५ शिधापत्रिकांना ७१३ क्विं. गहू, ९५२ क्विं. तांदूळ,व मूर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ६३०९ शिधापत्रिकांना ९४६ क्विं. गहू, १२६२ क्विं. तांदूळ, असे एकूण ४५ हजार २७८ शिधापत्रिकांना ६७९० क्विंटल गहू तर ९०६० क्विंटल तांदूळ असे नियतन मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे.