सार्वजनिक व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाची माहिती कळविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:30+5:302021-04-07T04:19:30+5:30

जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्‍तपदे सक्‍तीने अधिसूचित करणे) कायदा १९५९ व नियम १९६० च्‍या ...

Appeal to inform public and private establishments about manpower | सार्वजनिक व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाची माहिती कळविण्याचे आवाहन

सार्वजनिक व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाची माहिती कळविण्याचे आवाहन

Next

जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्‍तपदे सक्‍तीने अधिसूचित करणे) कायदा १९५९ व नियम १९६० च्‍या कलम ५(१) अन्‍वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय, तसेच कलम ५(२) अन्‍वये खासगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्‍थापनांनी त्यांच्या आस्‍थापनेवर असणाऱ्या सर्व कमचाऱ्यांची पुरुष/स्‍त्री एकूण अशी सांख्‍यिकी माहिती, प्रत्‍येक तिमाहीस विहीत नमुन्यात नियमितपणे, राज्य कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.

मार्च २०२१ अखेर संपणाऱ्या तिमाहीची माहिती नमुना ईआर-१ मध्ये संकलित करण्याचे काम जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला येथे सुरू आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व आस्‍थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझर नेम व पासवर्ड देण्‍यात आलेले आहे. त्‍याचा वापर करून प्रत्‍येकाने या विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर लॉगीन करावे व माहिती भरावी. यासाठी अंतिम मुदत दि. ३० आहे. प्रत्‍येक आस्‍थापनेने आपापला नोंदणी तपशील (Employer profile) देखील आवश्‍यक ती सर्व माहिती नोंदवून तत्‍काळ अद्ययावत करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात कोणत्‍याही स्‍वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्‍यक असल्‍यास ई-मेल आयडी akolarojgar@gmail.com/asstdiremp.akola@ese.maharashtra.gov.in यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व तपशिलांसह संपर्क साधल्‍यास कार्यालयातून सहकार्य उपलब्ध होईल, असेही कळविण्यात आले आहे.

Web Title: Appeal to inform public and private establishments about manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.