आवक वाढल्याने सफरचंदाचे दर घसरले; ग्राहकांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:36 PM2018-09-08T14:36:56+5:302018-09-08T14:37:05+5:30
अकोला : हिमाचल प्रदेशातून येणारी सफरचंदची आवक वाढल्याने महाराष्ट्रातील ठोक बाजारपेठेत सफरचंदचे दर पाचशे ते दोन हजार रुपयेकॅरेटपर्यंत पोहोचले आहेत.
- संजय खांडेकर
अकोला : हिमाचल प्रदेशातून येणारी सफरचंदची आवक वाढल्याने महाराष्ट्रातील ठोक बाजारपेठेत सफरचंदचे दर पाचशे ते दोन हजार रुपयेकॅरेटपर्यंत पोहोचले आहेत. सर्वसाधारण गुणवत्तेचे सफरचंद ५० रुपये, तर सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे सफरचंद शंभर रुपयांपर्यंत बाजारात आले आहे. सफरचंदचे भाव घसरल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे.
हिमाचल प्रदेशातील शिमला, परमानू, सोलन परिसरातून या ऋतूमध्ये महाराष्ट्रात सफरचंद येते. पूरस्थिती आणि हवामानाच्या अंदाजामुळे यंदा सफरचंद अपेक्षित नव्हते. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त सफरचंदची आवक महाराष्ट्रासह देशात होत असल्याने सफरचंदचे भाव उतरले आहेत. हिमाचल प्रदेशच्या उंच सखल भागात उत्पादित होत असलेल्या सफरचंदचा घाटाखालील आणि मध्य घाटातील माल मोठ्या प्रमाणात येत आहे. व्यापाऱ्यांना एवढा माल येईल, हे अपेक्षित नव्हते. मात्र, सातत्याने सफरचंद येत असल्याने दर सातत्याने उतरत आहेत.
बाजारपेठेत चार प्रकारचे सफरचंद
रेड गोल्डर, ग्रीन गोल्डन, रिचड, रॉयल या चार प्रकारचे सफरचंद दररोज अकोल्याच्या बाजारपेठेत येत आहेत. रॉयल चविष्ट असल्याने ग्राहकांची जास्त पसंती असते. त्या तुलनेत मात्र इतर सफरचंद स्वस्त दरात विकले जात आहेत.
हिमाचलचा कि न्नूर सफरचंद हा अमेरिकेतील वाशिंग्टन, न्यूझीलॅन्ड, चीन येथून येणाºया डिलेशनपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आणि चविष्ट आहे. इतर सफरचंदाच्या तुलनेत सहा महिने राहू शकेल, एवढी नैसर्गिक क्षमता त्यात आहे.
-मोहम्मद युनूस, उद्योजक, फ्रुट मार्केट अकोला.