जात पडताळणीसाठी १०२८ उमेदवारांचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:27+5:302020-12-27T04:14:27+5:30

अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याची ...

Applications of 1028 candidates for caste verification! | जात पडताळणीसाठी १०२८ उमेदवारांचे अर्ज!

जात पडताळणीसाठी १०२८ उमेदवारांचे अर्ज!

Next

अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये २५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ हजार २८ उमेदवारांनी जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर केले.

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये सुरू झाली आहे. या निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर करताना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पोचपावती व हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १४ डिसेंबरपासून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात सुरू झाली आहे. त्यामध्ये २५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ हजार २८ उमेदवारांनी जात पडताळणीसाठी जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात अर्ज सादर केले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांची गर्दी होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. २५ डिसेंबरपर्यंत जात पडताळणीसाठी जिल्ह्यातील १ हजार २८ उमेदवारांचे अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाला प्राप्त झाले.

पीयूष चव्हाण

सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती

Web Title: Applications of 1028 candidates for caste verification!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.