अडगाव मंडळातील सोयाबीन, कापसाला पीक विमा लागू करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:15 AM2021-05-28T04:15:00+5:302021-05-28T04:15:00+5:30
मागील वर्षी दुष्काळ व यावर्षी शेतकऱ्यांवर आलेल्या सोयाबीनचे दुबार पेरणीचे संकट आले होते. शेतकरी या अस्मानी संकटांना तोंड ...
मागील वर्षी दुष्काळ व यावर्षी शेतकऱ्यांवर आलेल्या सोयाबीनचे दुबार पेरणीचे संकट आले होते. शेतकरी या अस्मानी संकटांना तोंड देत कसाबसा उभा झाला. त्यातही सोयाबीनचे यावर्षी कमी उत्पन्न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. महसूल विभागाने जाहीर केलेल्या अडगाव बु. महसूल मंडळाची खरीप पिकाची सोयाबीन व कापसाची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. परंतु विमा कंपनीने, शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणतेही नुकसान लक्षात न घेता सोयाबीन कापूस पिकाचा विमा नाकारला. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे सोयाबीन, कापसाला पीक विमा द्यावा. अशी मागणी निवेदनातून शेतकरी इरफान अली मिरसाहेब, विजय उगले, धम्मपाल दारोकार, रमण वानखडे, राहुल भारसाकडे, विवेक इंगळे, शे. नसीम, राजू वानरे, विशाल भारसाकडे, रणजित भारताकडे आदींनी केली आहे.