सखी मतदान केंद्राचे कौतुक संपले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 05:24 PM2019-10-22T17:24:35+5:302019-10-22T17:24:35+5:30

दुपारी १ वाजतापपर्यंत १०४ महिलांनी मतदान केले. दिवसअखेरीस हा आकडा २५१ पर्यंतच गेला.

The appreciation of Sakhi polling station is gone! | सखी मतदान केंद्राचे कौतुक संपले!

सखी मतदान केंद्राचे कौतुक संपले!

googlenewsNext

- नीलिमा शिंगणे-जगड  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सखी मतदान केंद्राची स्थापना केली; मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी येथे झगमगाट पाहायला मिळाला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील या केंद्राविषयी कौतुक राहिले नाही. तसेच महिला मतदारांचादेखील यावेळी निरुत्साह दिसून आला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदाच सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. अकोल्यात दोन केंद्र स्थापन करण्यात आले होते. मतदान केंद्राचा अवघा परिसरच गुलाबी करू न रांगोळ्यांनी सजविला होता. हिरकणी कक्षात खेळणी ठेवली होती.
यावेळी मात्र असे सुंदर चित्र दिसले नाही. यावेळी अकोल्यात सीताबाई कला महाविद्यालय येथे सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली. केवळ एका खोलीत सखी बुथ तयार करू न गुलाबी फुगे स्वागत कमानीवर लावले होते. सेल्फ ी पॉइंटही उभारला होता. स्तनदा मातांच्या सोयीकरिता हिरकणी कक्ष स्थापन केला होता; परंतु या कक्षाला पडदे लावण्यात आलेले नव्हते. पिण्याच्या पाण्याचीदेखील सुविधा नव्हती. प्रसाधनगृहदेखील उपलब्ध केलेले नव्हते.
मतदान केंद्रात पाच महिला अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले होते. सुरक्षिततेसाठी महिला पोलीस शिपाई तैनात होत्या. अधिकारी व महिला पोलीसदेखील महिला मतदारांच्या प्रतीक्षेत बसलेल्या दिसल्या. सकाळी ७ वाजतापासून या मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले. एकट-दुकट महिला केंद्रावर येत होत्या. दुपारी १ वाजतापपर्यंत १०४ महिलांनी मतदान केले. दिवसअखेरीस हा आकडा २५१ पर्यंतच गेला. या ठिकाणी मतदान करण्यास आलेल्या माधुरी चिखलकर, स्नेहल धनोकार, शीतल जोशी आदी महिलांनी सांगितले की, मतदान करण्यास आले असता गर्दी नसल्यामुळे कोणताही त्रास झाला नाही. मतदान हा जन्मसिद्ध हक्क असल्याने प्रत्येक महिलेने मतदान करण्यास आवर्जून यायला पाहिजे. तसेच एका महिलेने येथे बर्थडे पार्टीमध्ये आल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले.
उच्च व मध्यमवर्गीय बहुतांश महिला पुरुषांवर अवलंबून असल्यामुळे मतदान केंद्रावर पोहचू शकल्या नाहीत. तसेच सलग सुट्या आल्यामुळे महिलांनी बाहेरगावी फिरण्याचा बेत आखला. मुलांना आणि घरातील प्रमुख पुरुषाला सुट्टी असल्यामुळे मतदानाकडे महिलांनी दुर्लक्ष केले. याशिवाय प्रशासनने या केंद्राकडे यावेळी दुर्लक्ष केले असल्याची मतदान केंद्र परिसरात चर्चा होती.

Web Title: The appreciation of Sakhi polling station is gone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.