दलित वस्तीतील ११ कोटींच्या कामांची मंजुरी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:10 AM2017-09-22T01:10:14+5:302017-09-22T01:10:19+5:30

अकोला: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने  जिल्हय़ातील काही ठरावीक गावातील दलित वस्तीच्या  कामांच्या ११ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना दिलेली मंजुरी  गुरुवारी झालेल्या समितीच्या सभेत रद्द करण्यात आली.  त्याचवेळी अनेक गावांतील वंचित दलित वस्त्यांच्या प्रस् तावांसह नव्याने २0 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्या त येईल, असेही सभेत ठरले. विशेष म्हणजे, दलित वस् तीच्या निधी वाटपात अनेक गावांवर अन्याय झाल्याचे  ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडले होते.

Approval of 11 crore works in Dalit settlement canceled | दलित वस्तीतील ११ कोटींच्या कामांची मंजुरी रद्द

दलित वस्तीतील ११ कोटींच्या कामांची मंजुरी रद्द

Next
ठळक मुद्देवंचित गावांच्या नव्या प्रस्तावांसह २0 कोटींची कामे प्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने  जिल्हय़ातील काही ठरावीक गावातील दलित वस्तीच्या  कामांच्या ११ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना दिलेली मंजुरी  गुरुवारी झालेल्या समितीच्या सभेत रद्द करण्यात आली.  त्याचवेळी अनेक गावांतील वंचित दलित वस्त्यांच्या प्रस् तावांसह नव्याने २0 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्या त येईल, असेही सभेत ठरले. विशेष म्हणजे, दलित वस् तीच्या निधी वाटपात अनेक गावांवर अन्याय झाल्याचे  ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडले होते.
दलित वस्ती विकास आराखड्यानुसार मूर्तिजापूर पंचायत  समितीमध्ये तब्बल २ कोटी २0 लाख रुपयांच्या कामांचा  यादीत समावेश आहे. २२ गावांतील दलित वस्तीच्या नावा पुढे निधी देण्यात आला. त्यातही भाजप सदस्याच्या सिरसो  गटातच हा निधी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या  एकाच मतदारसंघातील गावांमध्ये एक कोटी रुपयांचे  नियोजन आहे. अकोला तालुक्यातील ३२ गावांच्या दलित  वस्त्यांसाठी २ कोटी १७ लाख रुपयांचे प्रस्ताव आहेत. या  तालुक्यात भारिप-बमसंची सदस्य संख्या अल्प आहे. सदस्य  सरला मेश्राम यांच्या मतदारसंघातही निधी मिळालेला नाही.  त्याउलट इतर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये निधीचे  वाटप मोठय़ा प्रमाणात दर्शविण्यात आले आहे.  बाश्रीटाकळीतील कान्हेरी सरप, पातूर तालुक्यातही तोच  प्रकार घडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध  केले होते. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे  यांच्याकडे झालेल्या तक्रारीनुसार नियोजन रद्द करण्याचे  आदेश त्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यावर गुरुवारी  झालेल्या समितीच्या सभेत त्या नियोजनाला देण्यात आलेली  मंजुरी रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. आता दलित वस् ती विकास कामांसाठी असलेल्या एकूण २0 कोटींच्या निधी  खर्चासाठी नव्याने प्रस्ताव मागवा, त्या खर्चासाठी प्रस्ताव  आल्यानंतर सर्वांना एकत्रितपणे मंजूर करण्याचेही यावेळी  ठरले. यावेळी सभापती रेखा अंभोरे, सदस्य सम्राट  डोंगरदिवे, सरला मेश्राम, बाळकृष्ण बोंदरे, बाळापूरच्या  सभापती मंगला तितूर यांच्यासह प्रभारी समाजकल्याण  अधिकारी योगेश जवादे उपस्थित होते. 

पीठगिरणीचा निधी वळता
सर्वसाधारण लाभार्थींना पीठगिरणी वाटप योजनेसाठी तरतूद  केलेला ४९ लाखांचा निधी वळता करण्याचा ठराव घेण्यात  आला. हा निधी दलित वस्तीमध्ये असलेल्या खुल्या जागांवर  वृद्धांना बसण्याची सोय करणे, लहान मुलांसाठी  खेळण्याच्या सोयी-सुविधांवर खर्च करण्याचे ठरले. दिव्यांग  लाभार्थींना तीन टक्के खर्चातून पीठगिरणी दिली जाणार  आहे. 

जि.प.च्या शाळेत स्पर्धा परीक्षा पुस्तके
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुरवठा  करण्यासाठी पाच लाख रुपये तरतूद वाढवण्यात आली. आ ता १५ लाख रुपये खर्चातून जिल्हा परिषदेच्या ५१ माध्यमिक  आणि चार उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या  तयारीची पुस्तके दिली जाणार आहेत. या ठरावाला मंजुरी  देण्यात आली. 

Web Title: Approval of 11 crore works in Dalit settlement canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.