सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ४६५ पदांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:31 PM2019-08-09T12:31:52+5:302019-08-09T12:32:20+5:30
१०१६ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मागणी करण्यात आली होती; मात्र वैद्यकीय संचालकांनी केवळ ४६५ पदांनाच मंजुरी दिली असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
अकोला : केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या १५० कोटी रुपयांच्या निधीतून तयार झालेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी प्रशासनातर्फे ४६५ कर्मचाºयांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे; परंतु मंजूर पदांची संख्या ही अतिशय कमी असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे १०१६ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मागणी करण्यात आली होती; मात्र वैद्यकीय संचालकांनी ७७८ पदांसाठी वैद्यकीय शिक्षा सचिव यांच्याकडे शिफारस केली होती.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १ जानेवारी २०१४ मध्ये १५० कोटी रुपयांचा निधी घोषित करण्यात आला होता. ज्यामध्ये १२० कोटी रुपये केंद्र शासनातर्फे, तर ३० कोटी रुपये राज्य शासनातर्फे देण्यात येणार होते. रुग्णालयाच्या इमारतीचे निर्माण कार्य जवळपास पूर्ण झाले असून, वैद्यकीय उपकरणेही येऊ लागली आहेत; परंतु रुग्णालय संचालित करण्यासाठी येथे पदच मंजूर नव्हते. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्य विभागाकडे १०१६ पदांची आवश्यकता असल्याचे सांगत तसा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर वैद्यकीय संचालकांकडून ही पदसंख्या कमी करून ७७८ पर्यंत कमी केल्याची माहिती सूत्रांनी दिली; परंतु प्रशासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केवळ ४६५ पदांनाच मंजुरी दिली असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. मंजूर पदभरतीनंतर लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघणार असल्याने अकोल्यासह जवळपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना गंभीर आजारासाठी नागपूर किंवा मुंबईला जावे लागणार नाही.
या विभागातील राहणार तज्ज्ञ!
कर्करोगशास्त्र
किडनीशास्त्र
एंडोक्राइनालाजी
हृदयरोगशास्त्र
सीटीव्हीएस
न्यूरोलॉजी (स्नायू विज्ञान)
न्यूरो सर्जरी
अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १०१५ पदांची मागणी केली होती. यामध्ये वैद्यकीय अधिकाºयांसह इतर आवश्यक कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला होता. हा प्रस्ताव पाठविल्यानंतर ४६५ पदांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे.
- डॉ. कुुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.