मागासवर्गीय वस्ती कामांच्या यादीला मंजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:06 PM2019-02-27T13:06:13+5:302019-02-27T13:06:19+5:30
अकोला: जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील १ हजार ८६७ कामांच्या यादीला मंगळवारी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
अकोला: जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील १ हजार ८६७ कामांच्या यादीला मंगळवारी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या ४ फेबु्रवारी रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताला २६ फेबु्रवारी रोजी झालेल्या समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास योजना अर्थात मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांच्या बृहत कृती आराखड्यांतर्गत कामांच्या यादीवर शिक्कामोर्तब झाले असून, कामांची ही यादी आता प्रशासकीय मान्यतेसाठी संबंधित विभागांकडे सादर करण्यात येणार आहे. याच मुद्द्यावर सोमवार, २५ फेबु्रवारी रोजी झालेल्या समाजकल्याण समितीच्या सभेत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे सभा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवार, २६ फेबु्रवारी रोजी झालेल्या समितीच्या सभेत जिल्ह्यात मागासवर्गीय वस्त्यांमधील १ हजार ८९७ कामांच्या यादीला मंजुरी देण्यात आली. समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या सभेला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.