शिलाई मशीन, सायकल वाटप योजनेच्या लाभार्थी याद्यांना मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:35 AM2020-12-12T04:35:01+5:302020-12-12T04:35:01+5:30

शिलाई मशीन वाटप योजनेंतर्गत ४८८, लेडिज सायकल वाटप योजनेंतर्गत ४६२ आणि पिको मशीन वाटप योजनेंतर्गत १७४ लाभार्थींच्या याद्यांना सभेत ...

Approval of beneficiary lists of sewing machines, cycle allotment scheme! | शिलाई मशीन, सायकल वाटप योजनेच्या लाभार्थी याद्यांना मंजुरी!

शिलाई मशीन, सायकल वाटप योजनेच्या लाभार्थी याद्यांना मंजुरी!

Next

शिलाई मशीन वाटप योजनेंतर्गत ४८८, लेडिज सायकल वाटप योजनेंतर्गत ४६२ आणि पिको मशीन वाटप योजनेंतर्गत १७४ लाभार्थींच्या याद्यांना सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मनिषा बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या या सभेत समिती सदस्य गायत्री कांबे, योगीता रोकडे, रिजवाना परवीन शे. मुक्तार, मीनाक्षी उन्हाळे, लता नितोने, वंदना झळके, उर्मिला डाबेराव, अनसूया राऊत यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) विलास मरसाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शिलाइ मशीन, पिको मशीन

योजनेवर १४ लाखांचा निधी वळता!

शिलाई मशीन वाटप योजनेवर २० लाख व पिको मशीन वाटप योजनेवर १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती; परंतु दोन्ही योजनेच्या लाभार्थींची संख्या उद्दिष्टापेक्षा जास्त असल्याने या योजनांवर निधी खर्च न होऊ शकणाऱ्या प्रशिक्षण योजनांचा १४ लाख ७३ हजार रुपयांचा निधी वळता करण्यात आला. त्यामध्ये शिलाई मशीन वाटप योजनेवर ९ लाख व पिको मशीन वाटप योजनेवर ५ लाख ७३ हजार रुपयांचा निधी वळता करण्याचे सभेत ठरविण्यात आले.

Web Title: Approval of beneficiary lists of sewing machines, cycle allotment scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.