पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक आराखडयास मंजूरी; २० उपाययोजना प्रस्तावित
By संतोष येलकर | Published: June 9, 2024 04:25 PM2024-06-09T16:25:04+5:302024-06-09T16:26:54+5:30
२० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी विविध २० उपाययोजना पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अकोला: जिल्हयातील ग्रामीण भागात जून अखेरपर्यतच्या कालावधीसाठी पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक कृती आराखड्यास मंजूरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ५ जून रोजी दिला. त्यानुसार २० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी विविध २० उपाययोजना पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
१ ते ३० जूनपर्यंतच्या टप्प्यात जिल्हयातील २० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी २० उपाययोजनांच्या कामांचा पूरक कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व संबंधित यंत्रणामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. १४ लाख ८५ हजार रुपये अपेक्षित खर्चाच्या या पूरक कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजूरी देण्यात आली आहे.
पूरक आराखड्यातील गावांसह प्रस्तावित उपाययोजनांची संख्या
तालुका गावे उपाययोजना
अकोला ०३ ०३
बार्शिटाकळी ०८ ०८
बाळापूर ०० ००
पातूर ०५ ०५
मूर्तिजापूर ०० ००
अकोट ०२ ०२
तेल्हारा ०२ ०२
उपाययोजनांची अशी आहेत प्रस्तावित कामे
पूरक कृती आराखड्यात १३ विहिरींचे अधिग्रहण, ३ नवीन विंधन विहिरी व ४ कुपनलिका अशा एकूण २० उपाययोजनांची कामे पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत.
तातडीने करावी लागणर उपाययोजनांची कामे !
पावसाळा सुरु झाला असून, मान्सूनचा पाऊस लवकरच सुरु होणार आहे. जोरदार पाऊस सुरु झाल्यानंतर पाणीटंचाइ निवारणाच्या उपाययोजनांची कामे होवू शकणार नाही. त्यामुळे पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची कामे तातडीने करावी लागणार आहेत.