पाणीटंचाइ निवारणासाठी २० गावांत २० कुपनलिकांच्या कामांना मान्यता! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By संतोष येलकर | Published: April 15, 2024 07:56 PM2024-04-15T19:56:40+5:302024-04-15T19:57:12+5:30
या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्चा प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
अकोला: जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणाच्या कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांपैकी अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यातील २० गावांत २० कुपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी १२ एप्रिल रोजी दिला. मान्यता देण्यात आलेली कामे येत्या २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.उन्हाळ्यातील तापत्या उन्हासोबतच जिल्हयातील विविध भागात पाणीटंचाइची समस्या जाणवू लागली असून, ग्रामीण भागातील टंचाइग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्चा प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. या पार्श्वभमीवर जिल्हयातील अकोट तालुक्यातील एक व तेल्हारा तालुक्यातील १९ अशा एकूण २० गावांमध्ये पाणीटंचाइ निवारणासाठी २० कुपनिलकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुंभार यांनी दिला. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कुपनलिकांची कामे येत्या २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कुपनलिकांच्या कामांना मान्यता दिलेल्या गावांची नावे !
अकोट तालुक्यातील सावरगाव आणि तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी, वरुड बु.,गाडेगांव, घोडेगाव, तुदगाव, शेरी वडनेर, शेरी बु.,शेरी खुर्दी, मनात्री बु., मनात्री खुर्द, जाफ्रापूर, वाकाेडी, पिवंदळ बु., निंभोरा बु., वरुड वडनेर, बाभुळगाव, तळेगाव डवला व नांगरतास या २० गावांत २० कुपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.