सहा कोटींच्या रस्ते कामांच्या नियोजनाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 02:48 PM2018-11-03T14:48:50+5:302018-11-03T14:49:19+5:30
अकोला : सेसफंडातील सहा कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते कामांच्या नियोजनाला जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.
अकोला : सेसफंडातील सहा कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते कामांच्या नियोजनाला जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून उपलब्ध सहा कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. या कामांच्या नियोजनास बांधकाम समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. समितीच्या मागील सभेच्या इतिवृत्ताला सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती जमीरउल्लाखा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य संतोष वाकोडे, प्रतिभा अवचार, मंदा डाबेराव, सुनीता गोरे, बाळकृष्ण बोंद्रे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.