‘ऑटोडीसीआर’प्रणालीद्वारे होणार नकाशा मंजूर
By admin | Published: July 5, 2016 01:15 AM2016-07-05T01:15:33+5:302016-07-05T01:15:33+5:30
अकोला महापालिकेकडे ‘सॉफ्टटेक इंजिनियअर्स’कंपनीची निविदा प्राप्त
अकोला:इमारतींचे मंजूर चटई निर्देशांक (एफएसआय)पेक्षा दुप्पट-तिन पट अवैध बांधकाम करणार्या व्यावसायीकांच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने नगररचना विभागात नकाशा मंजूरीसाठी ऑटोडीसीआरप्रणाली कार्यान्वीत करणार आहेत. ऑटोडीसीआरसाठी प्रशासनाने निविदा बोलावल्या असता, या क्षेत्रातील नामांकीत सॉफ्टटेक इंजिनियअर्सकंपनी पुणेमार्फत एकमेव निविदा प्राप्त झाल्याची माहिती आहे. डवर्ग महापालिक ा क्षेत्रात रहिवाशी इमारती किंवा व्यावसायीक संकूल उभारण्यासाठी नगररचना विभागाच्या नियमानुसार एक चटई निर्देशांक (एफएसआय) मंजूर आहे. इमारतींचे बांधकाम करण्यासाठी एक एफएसआय पुरेसा नसल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याची मागणी बांधकाम क्षेत्रातील केड्राईसंघटनेसह इतर बांधकाम व्यावसायीकांमधून मोठय़ा प्रमाणात होत आहे. नियमांची ऐशीतैशी करीत मंजूर एफएसआयपेक्षा इमारतींचे चक्क दुप्पट-तीनपट अवैध बांधकाम उभारल्या जात आहे. पार्किंंगसाठी ,सांडपाण्यासाठी इंचभरही जागा न सोडता त्या जागेवर अतिक्रमण केले जात असल्याचे चित्र आहे. अवैध बांधकामाचे प्रमाण मोठे असल्यामुळे विकास कामे करताना प्रशासनाला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे इमारती असोत वा घरे यांचा नकाशा मंजूर करताना नियमांचे भान ठेवणे प्रशासनासह बांधकाम व्यावसायीकांकडून अपेक्षित आहे. यावर ठोस उपाय म्हणून नकाशा मंजूरीसाठी अत्याधुनिक ऑटोडीसीआर प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. यासंदर्भात प्रशासनाने निविदा प्रकाशित केली असता ह्यसॉफ्टटेक इंजिनियअर्सह्णकंपनी पुणे, यांची निविदा प्राप्त झाली. कंपनीने सादर केलेले दर कमी करण्यासाठी प्रशासनाने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी चर्चा केली. उत्पन्नात होईल वाढ अमरावती महापालिकेत पाच वर्षांंपूर्वी बांधकामाचा नकाशा मंजूरीच्या बदल्यात विकास शुल्कापोटी मनपाला ८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळत असे.