अखेर आॅफलाइन पीक विम्याचे १०.३८ कोटी मंजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:25 PM2019-06-07T15:25:53+5:302019-06-07T15:25:58+5:30
जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी १० कोटी ३८ लाख रुपयांची रक्कम अखेर शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे.
- संतोष येलकर
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत दोन वर्षांपूर्वी खरीप हंगामात पीक विम्याचे ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी १० कोटी ३८ लाख रुपयांची रक्कम अखेर शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आॅफलाइन अर्ज केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक विमा रकमेचा लाभ लवकरच मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१७ यावर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढण्यासाठी ‘आॅनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेतकºयांचे ‘आॅफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकºयांनी पीक विम्यासाठी सादर केलेले आॅफलाइन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात आले होते. पीक विम्यासाठी आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गतवर्षी जुलैमध्ये शासनाकडे सादर करण्यात आली होती. आॅफलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी निधी मागणीचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आला होता. अखेर आॅफलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांसाठी पीक विम्यापोटी शासनामार्फत १० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने मंजूर करण्यात आलेला निधी शासनामार्फत लवकरच प्राप्त होणार असून, जिल्ह्यात आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या ६ हजार ५९१ शेतकºयांना लवकरच पीक विमा रकमेचा लाभ मिळणार आहे.
‘आॅफलाइन’ अर्ज केलेले असे आहेत शेतकरी!
तालुका शेतकरी
अकोला ११७३
अकोट १६५९
तेल्हारा ७६०
बाळापूर ६६९
पातूर ११४३
बार्शीटाकळी ७४६
...............................................
एकूण ६५९१
२०१७ मधील खरीप हंगामात पीक विम्यासाठी जिल्ह्यात आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांसाठी विमा रकमेपोटी शासनामार्फत १० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर विम्याची रक्कम लवकरच शासनाकडून प्राप्त होणार आहे. रक्कम उपलब्ध झाल्यानंतर आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
-अरुण वाघमारे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.