जलवाहिनी फुटली;जनावरे धुण्यासाठी पाण्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:53 AM2021-02-20T04:53:57+5:302021-02-20T04:53:57+5:30
शहरातील जलवाहिनी,हातपंप, सबमर्सिबल पंपाच्या देखभाल दुरूस्तीसाठी जलप्रदाय विभागाने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. मागील दाेन महिन्यांपासून देखभाल दुरूस्तीच्या कामाला मंजूरी ...
शहरातील जलवाहिनी,हातपंप, सबमर्सिबल पंपाच्या देखभाल दुरूस्तीसाठी जलप्रदाय विभागाने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. मागील दाेन महिन्यांपासून देखभाल दुरूस्तीच्या कामाला मंजूरी न मिळाल्याने तसेच देयके थकीत असल्याने कंत्राटदारांनी आखडता हात घेतल्याची माहिती आहे. अशास्थितीत जलवाहिनीला गळती लागल्यास त्याची दुरूस्ती काेण करणार असा सवाल उपस्थित झाला आहे. परिणामी अकाेलेकरांना गळती लागलेल्या जलवाहिनीतून दुषित पाणीपुरवठा हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील वाठुरकर लेआऊट येथे जलवाहिनी फुटल्याने हजाराे लिटर पाण्याची नासाडी झाली. याठिकाणी स्थानिक रहिवाशांकडून जनावरांना धुण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला.
प्रभाग १६,१९मध्ये पाणीपुरवठा
प्रभाग १५ मध्ये ४०० व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली. या जलवाहिनीतून प्रभाग क्रमांक १६ व १९ मधील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जाताे. परिसरातील नागरिकांकडून पाण्याचा वापर जनावरे,दुचाकी,सायकली धुण्यासाठी करण्यात आला.
..फाेटाे मेल..