पाॅस्काे प्रकरणातील आराेपीस आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:57+5:302021-08-17T04:24:57+5:30
न्यायालयाने या प्रकरणात ८ साक्षीदार तपासल्यानंतर आराेपीविरुद्ध आढळलेल्या ठाेस पुराव्यावरुन त्याला पाेस्काे कायद्याच्या विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ यासाेबतच ...
न्यायालयाने या प्रकरणात ८ साक्षीदार तपासल्यानंतर आराेपीविरुद्ध आढळलेल्या ठाेस पुराव्यावरुन त्याला पाेस्काे कायद्याच्या विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ यासाेबतच ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठाेठावला़ दंड भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षेचे प्रावधानान न्यायालयाने केले आहे़ या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ॲड मंगला पांडे यांनी कामकाज पाहिले़ तर पैरवी अधिकारी म्हणून एएसआय प्रवीण पाटील यांनी कामकाज पाहिले़
शाळेतील समुपदेशनाने घटना उघड
बार्शीटाकळी तालुक्यातील एका खेडेगावात असलेली मुलगी सात वर्ष वयाची असताना तिच्यावर स्वप्नील डाेंगरे याने लैंगिक अत्याचार सुरु केले़ मात्र या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ असलेल्या मुलीने कुणाकडेही वाच्यता केली नाही़ एके दिवशी शाळेत लाैंगिक अत्याचार याच विषयावर समुपदेशन झाले़ त्यामुळे मुलीला तिच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच तीने कुटुंबीयांना सांगितले़ त्यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार केली़ वैद्यकीय तपासणीनंतर प्रकरणाचा उलगडा झाला़ या प्रकरणात शाळेतील समुपदेशन माेलाची भूमिका बजावणारे ठरले़
दुसऱ्या वर्गात असतानापासून छळ
पीडित मुलगी सात वर्षांची म्हणजेच दुसऱ्या वर्गात असताना पासूनच या मुलीचा लैंगिक छळ करण्यात आला़ सात वर्षांची असतानापासून तर १२ वर्षांची हाेईपर्यंत म्हणजेच या मुलीच्या हा प्रकार लक्षात येइपर्यंत तिचा अशा प्रकारे लैंगिक छळ सुरुच हाेता़ सतत पाच वर्ष लैंगिक छळ करणाऱ्या या आराेपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर तिला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत़