गांधी चाैकात ऑटाे चालकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:45+5:302021-01-13T04:44:45+5:30

खुले नाट्यगृह रस्त्यावर काेंडी अकाेला:खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैक पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत दाेन्ही बाजूने प्लास्टिक विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांनी ...

Arbitrariness of auto drivers in Gandhi Chaika | गांधी चाैकात ऑटाे चालकांची मनमानी

गांधी चाैकात ऑटाे चालकांची मनमानी

Next

खुले नाट्यगृह रस्त्यावर काेंडी

अकाेला:खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैक पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत दाेन्ही बाजूने प्लास्टिक विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण उभारले आहे. रस्त्यात साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आल्यामुळे या मार्गावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. साेमवारी गर्दीमुळे या रस्त्यावर वाहतुकीची काेंडी झाल्याचे दिसून आले आहे.

खड्डा ठरताेय जीवघेणा

अकाेला: मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारालगत रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी भला माेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. याठिकाणी भूमिगत नालीचे बांधकाम केले जाणार हाेते. हे काम अर्धवट असून हा खड्डा कायम असल्यामुळे बस स्थानकात येणारे प्रवासी तसेच शहरातील वाहनचालकांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद

अकाेला:शहरातील वाशिम बायपास चाैक ते बाळापूर नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकामधील एलइडी पथदिवे मागील चार महिन्यांपासून बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण हाेत असले तरी बांधकाम झालेल्या रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अंधाराचे साम्राज्य आहे.

व्हाॅल्व्ह नादुरुस्त;पाण्याचा अपव्यय

अकाेला:रेल्वे स्टेशन चाैकात महापालिकेचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपुलालगतच्या भागात व्हाॅल्व्ह नादुरूस्त झाल्याने याठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत आहे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

परिसरात साचले पाणी

अकाेला: जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आऊटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी जलप्रदाय विभाग पुढाकार घेईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

जलवाहिनीच्या पाइपची पळवापळवी

अकाेला: ‘अमृत’याेजने अंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे बदलण्याचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्यालगत उघड्यावर पाइप टाकले आहेत. यामधील सहा,आठ ते दहा इंच व्यासाच्या पाइपची नागरिकांनी पळवापळवी सुुरू केल्याची माहिती आहे. यामुळे जलवाहिनीचे जाळे टाकताना कंत्राटदाराला अडचणीचा सामना करावा लागत आहे.

मैदानाला अतिक्रमणाचा विळखा

अकाेला: जुने शहरातील डाबकी राेडवरील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या जागेवर अतिक्रमकांनी झाेपड्या उभारल्याचे समाेर आले आहे. मैदानालगत नागरिकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शाैचालय असून त्याठिकाणी सुध्दा लाकूड व्यावसायिकांनी अतिक्रमण थाटले आहे.

थाेर पुरुषांचे पुतळे दुर्लक्षित

अकाेला:तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत शहराच्या मध्यभागातील प्रमुख चाैकांमध्ये थाेर पुरुषांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आले. या पुतळ्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. आजराेजी थाेर पुरुषांचे पुतळे धुळीने माखल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Web Title: Arbitrariness of auto drivers in Gandhi Chaika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.