रेशन धान्य दुकानदाराची मनमानी; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:19 AM2021-07-30T04:19:54+5:302021-07-30T04:19:54+5:30
माझोड येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक उंटवाल यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर दुकान हे कापशी येथील अ. ना. पाटील यांना ...
माझोड येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक उंटवाल यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर दुकान हे कापशी येथील अ. ना. पाटील यांना जोडण्यात आले आहे. नवीन दुकानदार असल्यामुळे सर्व धान्य वाटप व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा असतानाच नवीन दुकानदार मनमानी करीत आहेत. नागरिकांना त्रास देत आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नियमानुसार धान्य वाटप करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
माझा भाऊ कॅन्सरग्रस्त असून त्यांच्या रेशन कार्डवर आधी आरसी नंबर नव्हता, तेव्हा तहसील कार्यालयातून आरसी नंबर आणल्यानंतर माल मिळेल, असे स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितले होते. आम्ही मजुरी पाडून तहसील कार्यालयाच्या चकरा मारल्या आणि आरसी नंबर लिहून आणला. यानंतरही धान्य दुकानदाराने माल दिला नाही.
- संदीप भड, माझोड
तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदाराने दुकानासमोर रेटबोर्ड लावणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना माल दिल्यानंतर किती पैसे घेतले. त्याची पावती देणेसुद्धा बंधनकारक आहे. दुकानदाराबाबत तक्रार आल्यास कारवाई करू.
- डॉ. अमोल पळसपगार, पुरवठा अधिकारी