अकोला जिल्हय़ात कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढले
By admin | Published: November 23, 2014 01:17 AM2014-11-23T01:17:39+5:302014-11-23T01:17:39+5:30
शेतकरी सामूहिक गटाचा सहभाग, शिवापूर येथे दीडशे हेक्टरवर कांदा बीजोत्पादन.
अकोला: जिल्हय़ात कांदा पिकाचे क्षेत्र वाढत असून, शेतकरी सामूहिक गटाने पुढाकार घेतल्याने या कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शिवापूर येथील शेतकरी सामूहिक गटाने दीडशे हेक्टरवर कांदा लागवड करू न भरघोस कांद्याचे उत्पादन घेतले आहे.
जिल्हय़ात कांदा हे भाजीपाला पीक दुर्मीळ होत चालले असताना, आत्मा आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने पुन्हा कांदा बहरला असून, कांदा उत्पादनासाठी शेतकरी गट तयार झाले आहेत. शिवा पूर येथील शेतकरी गट व शेतकर्यांनी स्वतंत्ररीत्या एकशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन पिकाची लागवड केली आहे. कांदा बीजोत्पादन पिकापासून चांगले उत्पादन मिळत असल्याने या परिसरात, शेजारच्या गावातील शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळला आहे.
जिल्हय़ात कांदा उत्पादन वाफ्यानुसार घेतले जात आहे; परंतु सलग दीडशे हेक्टर कांदा या ठिकाणी घेतला जात असून, या पिकांतून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटाच्या सदस्यामध्ये उत्साह आहे. पुढच्यावर्षी या क्षेत्रात वाढ करण्यात येणार असून, कांदा हे पीक अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणारे असल्याने या पिकावर गटांनी लक्ष केंद्रित केले आहे. इतरही नावीन्यपूर्ण पिके घेण्यासाठीचा संकल्प या शेतकरी गटाने केला आहे.
शेतकर्यांच्या या कांदा बीजोत्पादन प्रयोगाला जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी भेट दिली. जिल्हाधिकार्यांनी बचत गटाचे अध्यक्ष वैकुंठ ढोरे आणि सचिव सुनील सिरसाट यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. शेतकरी गटाच्या माध्यमातून या कांद्याचे ब्रॅन्ड करण्यावर भर देऊन कांद्याची विक्री करण्याचा सल्ला जिल्हाधिकार्यांनी दिला. यासाठी कृषी विभाग, आत्माने या गटांना कांदा बीजोत्पादनासाठी जशी मदत केली तशीच मदत बॅ्रन्डसाठी करावी, अशा सूचना केल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी कृषी व आ त्मांतर्गत ज्या योजना असतील त्या योजनांचा शेतकरी गटांना लाभ व्हावा, हा प्रयत्न केला जात असून, शिवापूरच्या शेतकरी गटासोब त आम्ही असल्याचे सांगितले.