अर्जुन समाज गणेश मंडळाने फडकविले काळे झेंडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:22 AM2017-09-06T01:22:17+5:302017-09-06T01:23:37+5:30
अर्जुन समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती २१ फुटांपेक्षा अधिक उंच असल्याचे कारणाने जिल्हा प्रशासनाने या मंडळाला विसर्जन मिरवुणकीत सहभागी होण्यास विरोध केल्याने या मंडळाद्वारे प्रशासन व व स्थानिक पदाधिकार्यांच्या नावाने जाहीर निषेधाचे फलक लावून काळे झेंडे फडकाविले. या प्रकारामुळे मानेक टॉकीज परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अर्जुन समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती २१ फुटांपेक्षा अधिक उंच असल्याचे कारणाने जिल्हा प्रशासनाने या मंडळाला विसर्जन मिरवुणकीत सहभागी होण्यास विरोध केल्याने या मंडळाद्वारे प्रशासन व व स्थानिक पदाधिकार्यांच्या नावाने जाहीर निषेधाचे फलक लावून काळे झेंडे फडकाविले. या प्रकारामुळे मानेक टॉकीज परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
माळीपुरा परिसरातील अर्जुन समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गत ८१ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे. या मंडळांच्या गणेश मूर्तीची उंची २१ फुटांपेक्षा अधिक असल्याने विद्युत वितरण कंपनीच्या तारांना लागणार हा धोका लक्षात घेता, या मंडळाला सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे या मंडळाच्या कार्यक र्ते व पदाधिकार्यांनी या परिसरात दिवसभर काळे झेंडे फडकावित प्रशासन व स्थानिक पदाधिकार्यांचा निषेध केला.
गणेश मूर्तीपुढे दिवसभर बंदोबस्त
सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी नाकारल्यानंतर मंडळाच्या गणेश मूर्तीसमोर पोलीस प्रशासनाद्वारे दिवसभर ते रात्री उशिरापर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर वातारवणात तणाव निर्माण झाल्याने मूर्तीच्या चारही बाजूने बॅरीकेड्स लावण्यात आले होते.
दिवसभर तणाव
अर्जुन समाज गणेशोत्सव मंडळाला परवानगी नाकारल्यानंतर या परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. क्यूआरटी, आरसी पीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणावर ठाण मांडून होते.
मंडळातील वादाची चर्चा
अर्जुन समाज सार्वजनिक गणेशाोत्सव मंडळाला परवानगी नाकारल्यानंतर या ठिकाणावर दोन मंडळातील वादामुळे ही परवानगी नाकारल्याची चर्चा होती. त्यामुळे या ठिकाणावर वाद होण्याची शक्य ता असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-