खनिकर्म विभागासाठी सशस्त्र सुरक्षा ‘कवच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:30 PM2018-11-02T13:30:13+5:302018-11-02T13:30:43+5:30

अकोला : गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात कारवाई करणाऱ्या अधिकाºयांच्या सुरक्षेसाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत चार सशस्त्र सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे

Armed security for the mining department | खनिकर्म विभागासाठी सशस्त्र सुरक्षा ‘कवच’!

खनिकर्म विभागासाठी सशस्त्र सुरक्षा ‘कवच’!

googlenewsNext

- संतोष येलकर
अकोला : गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात कारवाई करणाऱ्या अधिकाºयांच्या सुरक्षेसाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत चार सशस्त्र सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाला सशस्त्र सुरक्षा ‘कवच’ उपलब्ध झाले. गौण खनिजासंदर्भात कारवाई करणाºया अधिकाºयांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र सुरक्षारक्षक नेमण्याचा अकोला जिल्हा खनिज प्रष्ठिानचा राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.
वाळू आणि इतर गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतुकीसंदर्भात कारवाई करणाºया महसूल विभागाचे अधिकारी आणि खनिकर्म विभागाच्या अधिकाºयांवर जीवघेण्या हल्ल्यांच्या घटना होत असतात. त्यामुळे गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाºयांना जीव धोक्यात टाकून कारवाई करावी लागते. त्यानुषंगाने शासनाच्या वाळू धोरणानुसार गौण खनिजासंदर्भात कारवाई करणाºया जिल्हा खनिकर्म अधिकाºयांसह महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील अधिकाºयांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्हा खनिज प्रतिष्ठानामार्फत सैन्य दलातील सेवानिवृत्त चार जवानांची सशस्त्र सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा खनिकर्म अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आकस्मिक धाड पथकासह तहसीलदारांमार्फत कारवाईच्यावेळी या सशस्त्र सुरक्षारक्षकांची मदत घेण्यात येते. गौण खनिजासंदर्भात कारवाई करणाºया जिल्हा खनिकर्म विभाग व महसूल अधिकाºयांच्या संरक्षणासाठी सशस्त्र सुरक्षारक्षकांचे ‘कवच’ उपलब्ध करून देण्याचा अकोला जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत सुरू करण्यात आलेला राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.


सुरक्षारक्षकांची मानधनावर नेमणूक!
गौण खनिजासंदर्भात कारवाई करणाºया जिल्हा खनिकर्म अधिकाºयांसह तहसीलदारांच्या सुरक्षेसाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत गत मे महिन्यात सैन्य दलातील सेवानिवृत चार जवानांची सशस्त्र सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

गौण खनिजासंदर्भात कारवाई करताना अधिकाºयांच्या सुरक्षेसाठी शासनाच्या वाळू धोरणानुसार जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून चार सशस्त्र सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
-डॉ. अतुल दोड,
जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

 

Web Title: Armed security for the mining department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला