‘हप्ता’ वसुलीवरून दोन गटात सशस्त्र हाणामारी
By admin | Published: January 15, 2017 07:47 PM2017-01-15T19:47:43+5:302017-01-15T19:47:43+5:30
ताजनापेठ परिसरात रोडवर लावण्यात येत असलेल्या हातगाड्यांच्या हप्ता वसुलीवरून दोन गटात
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 15 - ताजनापेठ परिसरात रोडवर लावण्यात येत असलेल्या हातगाड्यांच्या हप्ता वसुलीवरून दोन गटात काल मध्यरात्री सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये तीन ते चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांवर हप्ता वसुली करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र, हा पोलीस कर्मचारी दबावाला बळी न पडल्याने त्यांना या प्रकरणामध्ये नाहकच गोवण्यात आल्याची माहिती आहे.
रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेल्या तक्रारीनुसार ताजनापेठ परिसरातील मटन मार्केटमधील दुकानाचे भाडे वाढविण्याच्या कारणावरून मो. अनिस शेख अयुब यांचे भाऊ मो. जफर शेख अयुब यांना याच परिसरातील रहिवासी सै. लियाजअली सै. आसिक अली, सै. आरीफ अली सै. आसिक अली, सै. इद्रीस अली सै. आसिक अली आणि सै. अनिस अली सै. आसिक अली यांनी सशस्त्र मारहाण केली. या मारहाणीत मो. जफर शेख अयुब गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये मटन मार्केटमधील भाडेवाढीचे कारण देण्यात आले असले, तरी ही हाणामारी या परिसरात सुरू असलेल्या हप्ते वसुलीवरून झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.